ERA Seminar 1: October 04, 2021
कासेगाव एज्युकेशन सोसायटी या संस्थेतील शाळांनी ERA LMS वापरण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आणि त्या अनुषंगाने चर्चा व्हावी या उद्देशाने दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रथम सदरीकरण सत्र आयोजित करण्यात आले. संस्थेच्या २८ शाळांपैकी ७ शाळांनी या सत्रात सहभाग घेतला आणि आपण केलेल्या कामाची माहिती दिली. प्रातिनिधिक स्वरुपात त्यातील काही शिक्षकांच्या सदरीकाराणाविषयी माहिती येथे दिली आहे.
१. मॉडर्न हायस्कूल, साखराळे
एस. एल. माली मॅडम यांनी ERA LMS संबंधित सादरीकरणाच्या प्रथम सत्रात सहभागी होऊन त्यांचे याबाबतचे अनुभव मांडले. ‘Teacher Dashboard’ वापरून ‘Content Repository’ कशी तयार करावी, त्यामध्ये ‘Add content’ कसा करावा हे त्यांनी समजावून सांगितले. YouTube वरून Video घेऊन तो कसा attach हेही त्यांनी व्यवस्थित सांगितले. याचबरोबर Table of Content कसे बनवायचे, Assignment कशी तयार करायची, upload कशी करायची हेही त्यांनी प्रत्यक्ष दाखवले. Quiz बनवायचा कसा, View कसा करायचा हेही दाखवले. हे सर्व करताना विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ मधील पाठाचा त्यांनी संदर्भ घेतला.२. शिवाजी हायस्कूल, बावची
आर. एस. पांढरबळे सर यांनी सादरीकरणाच्या प्रथम सत्रात सहभागी होऊन त्यांचे याबाबतचे अनुभव मांडले. इयत्ता पाचवी, मराठी या वर्गासाठी त्यांनी ERA LMS वापरून सण एक दिन या पाठसंदर्भात केलेल्या कृती स्पष्ट केल्या. Teacher Dashboard वापरून Content Repository कशी तयार करावी, त्यामध्ये Add content कसा करावा हे त्यांनी समजावून सांगितले. YouTube वरून Video घेऊन तो कसा वापरायचा हेही त्यांनी व्यवस्थित सांगितले. याचबरोबर Table of Content कसे बनवायचे, Assignment कशी तयार करायची, upload कशी करायची हेही त्यांनी प्रत्यक्ष दाखवले. Quiz बनवायचा कसा, View कसा करायचा हेही दाखवले.३. जागृती विद्यालय, चिखलहोळ
श्री. लोहार एम. व्ही. जागृती विद्यालय, चिखलहोळ. यांनी इयत्ता १० वी साठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील गुरुत्वाकर्षण संकल्पनेबाबत Content बनवणे, योग्य video शोधून attach करणे, त्यावरच आधारित प्रश्न, प्रश्नमंजुषा आणि assignment बनवणे, चाचणी तयार करणे आणि हे सर्व करण्यासाठी त्यांनी कोणती पूर्वतयारी केली हे विषद केले. त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात------
श्री. लोहार एम. व्ही.
सहा. शिक्षक जागृती विद्यालय, चिखलहोळ.
४ ऑक्टो. २०२१ रोजी आपण इरा LMS मार्फत आयोजित केलेल्या चर्चा सत्रामध्ये माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो. अशाप्रकारे सादरीकरण करताना खूप आनंद झाला. माझ्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांना ही प्रणाली व्यवस्थित समजावी या हेतूने PPT च्या सहाय्याने सादरीकरण केले. काही अडचणी आल्या परंतु त्या बेनझीर मॅडम तसेच रेवती मॅडम यांच्या माध्यमातून सोडविण्यास मदत झाली. त्याबद्दल त्यांचे आभार. या चर्चा सत्राचा माझ्या सर्व शिक्षक बंधु भगिनी यांना चांगला उपयोग होईल याची मला खात्री वाटते.
पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार ...........