एमकेसीएल इरा ही शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालये, पॉलिटेक्निक, ITI आणि कौशल्य विकास केंद्रांसाठी सर्वसमावेशक, अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थापन प्रणाली आहे.
अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन प्रभावी करण्यासाठी या प्रणालीत अनेक सुविधा आहेत. शिक्षक, विद्यार्थी, संस्था प्रशासक आणि व्यवस्थापक या सर्वांनाच सक्षम करणारी फीचर्स हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.
शालेय / महाविद्यालयीन शिक्षणातील सर्व सहभाग-धारकांच्या शैक्षणिक कामात सुसूत्रता आणणारी ही एकात्मिक लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे.
विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी आवश्यक अशा अनुभवाची रचना करण्यासाठी (लर्निंग एक्स्पिरिअन्स डिझाईन), शिक्षकांना मदत करणारी ही प्रणाली आहे.
अध्ययन व्यवस्थापनातील अशैक्षणिक कामांचे ऑटोमेशन करून शिक्षकांना शैक्षणिक नवोन्मेष करण्याच्या संधी ‘इरा’ मधून मिळतात.
‘इरा’ ही अद्ययावत् तंत्रज्ञानाचा वापर केलेली, ‘हाय-टेक’ आणि त्याचबरोबर शैक्षणिक प्रक्रियेतील मानवी आंतरक्रियांचा समावेश करून घेणाऱ्या ‘हाय-टच’ किंवा ‘ह्युमन टच’ ने समृद्ध अशी ही प्रणाली आहे.
‘इरा’ च्या मदतीने शिक्षकांना, अभ्यासक्रमानुसार विषयांसाठी शैक्षणिक आशयाची निर्मिती, वितरण, अध्यापन, त्यावर आधारित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन रचता येते.
सध्या प्रचलित ऑनलाईन मीटिंग / कॉन्फरन्ससाठी वापरली जाणारी कोणतीही प्रणाली, शिक्षकांतर्फे वापरली जात असेल तर, विद्यार्थ्यांना ‘इरा’ प्रणालीतून या लाइव्ह सत्रांशी सहज जोडून घेता येते.
अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन यांचे प्रत्यक्ष पुरावे ‘इरा’ प्रणालीत नोंदविले जातात. त्यानुसार शासकीय निकषांची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याचे सिद्ध करणे सहज शक्य होते.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ तसेच ‘राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा २००५’ नुसार अपेक्षित अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘इरा’ प्रणाली शिक्षकांना व शाळा/महाविद्यालय-व्यवस्थापनाला सक्षम करते.
विद्यार्थी
शिक्षक
संस्था
वर्गखोल्या आयोजित केल्या